Saturday, October 07, 2006

 

चव्ह्याट्यावर उभा गाधींवाद!!!

देशतील सत्ताधारी पक्ष कांग्रेस कडुन वेगळ्या-वेगळ्या वेळीवेगळ्या-वेगळ्या नेतेसंबधामुळे आज देश द्विधा मनःस्तिथित आहे. आज संपुर्णदेश हाच विचार करत आहे कि कांग्रेस तेव्हा ठिक होती कि आज! होय मी बोलत आहे आजपासुन ७५ वर्षा पूर्वीच्या घटने बद्दल, कि जेव्हा कांग्रेसचे नेर्तुत्व अपरोक्षपणे गांधीजी करत होते, तेव्हा जी स्थिती कांग्रेसमध्ये गांधीजीची होती आज त्यापेक्षाही मोठी सोनियां गांधीची आज आहे. व्यक्ती तसे उद्देश वेगळे वेगळे आहेत पण घटना एकच आहे. त्यावेळी सुद्धा संसद भवनामध्ये स्फोट केला होता व आज संसदेवर हल्ला केला गेला. तेव्हा स्फोट घडवण्यामागे उद्देश देशभक्ती होती आणि आज देशद्रोही पणा आहे.

आज संसदेवर हल्ला करणारया अतिरेक्यांची फाशीची शिक्षा रद्द करावी ह्याची मागणी करत आहेत, कि ज्या पक्षाने इतिहासामध्ये शहिद भगतसिंग, सुखदेव आणिराजगुरु ह्यांची फाशीची शिक्षा माफ करावी ह्याचा विरोध केला होता. गांधीजीच्या म्हणण्याप्रमाणे अहिंसेच्या मार्गामध्ये आड येणारयांचे समर्थन करणार नाही, जरी ते भारतीय असले तरी. जर तेव्हाचे देशभक्त अंहिसेच्या मार्गावर आडकाठी आणणारे होते, तर आजचे गद्दार/देशद्रोही काय शांतीच्या नावे काय कबुतरे उडवत आहेत? हाच पक्ष त्यावेळी ह्या तिन देशभक्तांना फाशी देत असताना गात होता"साबरमती के संत तुने कर दिया कमाल". तेव्हा पासुन ह्या पक्षाने आजपर्यंत कमाल करण्याचे सोडलेले नाही. तेव्हा कांग्रेसमध्ये गांधीवादाने कमाल होत होता, तर आज आंतकवादीच्या रुपाने होत आहे. आज कांग्रेस ज्याठिकाणी उभी आहे ती, त्यावेळेपासुन १८० अंशात पलटली आहे. आज त्याच पक्षाचा मुख्यमंत्री फाशीचा विरोध करत आहे, तर पक्ष नेर्तुत्व मुकपणे बसलॆ आहे. तेव्हासुद्धा तो मुकपणेच बसला होता, ज्या वेळेला संपुर्ण देश क्रांतिकारकांच्या प्राणांची भिक मागत होता. संपुर्ण देशाला माहित होते गांधीजी ह्या तिन शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु ह्यांना वाचवू शकतात, पण आपली अंहिसेला (धर्म हट्टाला) पेटुन गांधीजींनी फाशीची शिक्षा रद्द करावी असें म्हटले सुध्दा नाही. गांधीजींचे असे व्यक्तिमत्व होते कि ते इंग्रजांकडुन ते काहीही मनवुन घेऊ शकत होते. पण नाही, त्यांच्या डोक्यावर भुत होते अहिंसेचे. पण अहिंसेच्या नाका समोर इंग्रजांनी कित्येकांना वेठिस धरले, तेव्हा कुठे गेली होती अहिंसा? आज त्याच पक्षाच मुख्यमंत्री आतिरेक्यांचे समर्थन करत आहे. आणि कांग्रेस अध्यक्षा मौन बाळगुन आहेत. ह्या मौनाचा अर्थ समर्थन मानायचा कि असमर्थन? आज तर पक्षाचे प्रवक्ते सिघंवी साहेबाच्या बोलण्यातुन मुख्यमंत्र्याचे समर्थनच केले आहे. आज देशा समोर प्रश्न उभा आहे कि हि गांधीजीची कांग्रेस आहे, का हि गांधीजींच्या आर्दशा समवेत गाडुन टाकली आहे.

तो काळ हा देश स्वातंत्र्याचा होता. त्यावेळी देशाच्या सुपुत्राची अपेक्षा होती कि गांधींजी इरविन पैक्ट मध्ये आपल्या मागण्यामध्ये भगतसिंग आणि आदी यांच्या फाशी माफीची मागणी करावी, पण गांधींनी स्पष्टपणे सागितले कि ह्याची माफी मागणे म्हणजे हिंसेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. मी हिंसेचे समर्थन करणार नाही. आज प्रतेक देशवासीयांची इच्छा आहे कि लोकतंत्रावर (संसदेवर) हल्ला करणारय़ची फाशी पुढे अथवा रद्द करु नये. पण आजचे नेर्त्रुत्व काही वेगळा विचार करत आहे. ह्याचीच मला खंत वाटतीय. मनामध्ये प्रश्न उठतो कि कांग्रेस सदैव देशाच्या सामुहिक विचाराच्या विपरित काम करणार? ह्यातुन हेच सिद्ध होतय कि गांधींवाद २ औक्टबरला श्रद्धेने फुल आणि नोटांवर प्रतिमा छापण्या पर्यंतच सिमित आहे. आणि आत्ताच्या नेत्यांनी गांधींवादाला चव्हाट्यावर आणुन ठेवले आहे. आज त्यांचेच वंशज गांधींवादावर मुठमाती टाकण्याचे काम करत आहेत.

जी चुक गांधींनी त्यावेळेला केली होती, तिच आज त्यांचे वंशज आज करत आहेत.

मुळ लेखन = प्रमेंद्र प्रताप सिंह.
मराठी अनुवाद : योगेश फाटक.

Comments:
Vande Mataram !

Yogesh deshachya sadhyachya paristhitivar kelele 1 chan likhan aahe !! Congress cha gandhivaad ka kiti khotarda aahe he chan lihale aahe !! 1 goshat aahe deshala sarvat jast dhokha ahsya vicharsarnichya lokan kadun aahe. So keep writing like this.

Jaihind !!!

Rahul Shinde.
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?