Sunday, October 15, 2006

 

ह्या फारुक अब्दुलाचे डोके ठिकाणावर आहे काय?

वंदे मातरम,

सि.न.न. वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फारुक अब्दुलानी थेट भारतास आव्हान दिलेले आहे. त्यानी असे म्हटले आहे कि जर अफजलला फाशी झाली तर न्यायाधिशांचे मुडदे पडतील. ह्याला त्याने दुजोरा दिलाय तो "मकबुल बट"ह्या अतिरेक्याला फाशीची शिक्षा सुनावणारे न्या. निळकंठ गंजुचा. ह्या न्यायमुर्तिंना काश्मिरमध्ये गोळ्या घालुन ठार मारण्यात आले. आपण ह्यावरुन असे समजू शकतो की तेथिल अतिरेक्याच्या मनात असणारी आपल्या बद्दलची भावना आणि आपल्या बद्दलचे मत. तेथिल मुसलमान जनतेने केलेल्या उग्र निदर्शनावरुन पण त्यांचे मत काही ह्याच्या पेक्षा काही वेगळे असतील असे म्हणता येणार नाही. काही लोक म्हणतात कि ह्यच्या ह्या बोलण्याचा अर्थ असा होऊ शकतो कि, तेथिल अतिरेकि हे काय करु शकतात. ह्याचे समर्थन करता येणार नाही, कारण ह्यच्या आधीपासुनच फारुकनी अफजलच्या फाशीला विरोध केलाय. अतिरेकी क्रुत्य करणारयांना धर्म नसतो असे एकिकडे म्हणणारे नेते दुसरिकडेत्याचे वकिलपत्र घेतल्या प्रमाणे त्याची बाजू घेत आहेत. वकिलपत्र नाकारुन आणि राष्ट्रपतींकडे त्याच्या बायकोने दिलेल्या माफी पत्रावर सही न करणारा अफजल किती निरढावलेला आहे असे दिसते. व दुसरीकडे काही महाभाघ त्याच्याबाबतीत र्निणय हा एकतर्फी आहे असे म्हणत आहेत. ह्या वरुन अफ़जला नायक (हिरो) व्हायचय असेच दिसते.

मुंबईतील झालेल्या लोकलमधिल विस्फोट मालिकेमागे पकिस्तानचाच हात आहे असे म्हणुन नंतर भारताने पाकिस्तानशी असणारे राजनितिक संबध तोडुन टाकले. हे वागणे किती बेजवाबदार आहे हे नंतरच्या क्रुत्यावरुन जाणवते. ब्राझिल देशात झालेल्या परिषदेनंतर एका महासत्तेच्या (अमेरिकेच्या) दबावाल झुकुन परत हे संबध जोडण्यात आले. आपल्या केंद्रसरकारची मते हि परखड नसल्याने अश्या महासत्तेच्या दबावाला झुकावे लागते. आपले व माझे आवडते राष्ट्रपती म्हणतात कि आपणहुन आपल्या देशाला आपण महासत्ता संबोधले पाहिजे अणि दुसरीकडे आपले राज्यकर्त्यांच्या नितीमुळे आपणास महासत्तेच्या दबावापुधे झुकावे लागते. आज जगात महासत्ता म्हणुन उदयास येण्यास भरपुर वेळ असला तरी, आपणास अजुनही आशियाखंडामध्ये आपला पत्ता जमावता आलेला नाहिये.

आपले राज्यकर्ते हे आपल्यातच भाडणं लावुन स्व:ताच्या पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत. संसदेवर हल्ला करणारयास मोकळे सोडणार नाही असे म्हणणारे, दुसरीकडे त्याच्य बायकोच्या शिक्षा माफ़िच्या अर्जावर विचार करत आहेत. एकुणच हा प्रकर आपण बघण्या पलिकडे काही करु शकत नाहि. १९६१ च्या कायद्या नुसार आपणास अजुनही मत बाद करण्याचा अधिकार मिळालेला नाही. त्यामुळे कितिही ठरवुन सुद्धा त्यांना आपण धडा शिकवू शकत नाही.

जर अफजलची फाशी रद्द झाली तर त्याचे परिणाम फार भयंकर होतिल व ते पुर्ण भारतवर्षात दिसतील. म्हणजे १९९३ च्या स्फोट मालिकेतील आरोपीना सुद्धा माफी द्यावी म्हणुन सर्व भारतातील मुसलमान उग्र निदर्शने करतील. आणि आपण बघ्याची भुमिकेशिवाय काहिही करु शकणार नाही.

आतातरी एकत्रितपणे आपल्या सर्व राजकिय पक्षातिल लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीच विरोध करायला पाहिजे नाहि तर पुढिल १५ वर्षा नंतर महासत्ता तर सोडा, साधा एकसंध राष्ट्र म्हणुन सुद्धा उभे राहू असे सागंता येणार नाही. १३% च्या मतपेटी साठी ८० कोटी जनतेला वेठिस धरणे बंद करावे. अन्यथा आपन आपले अस्तित्व सुद्धा टिकवू शकणार नाही.

गप्प बसणे म्हणजे ह्याला विरोध करणे असे होत नाही. जर राज्यकर्ते"आपल्यावर कोणी वार केला तर आपण पलटुन वार करायचा नाही; ह्याने वार करणारयाच्या मनात आपल्या बद्दल मान वाढतो" अश्या भोळ्या-भाबड्या गांधीगीरीच्या सिंद्धांतावर अवलंबुन राहिल्यास हे शहाणपणाचे होणार नाही.

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!

योगेश रत्नाकर फाटक.


Comments:
योगेश जी, आपने सुन्दर लेख लिखा है और आपके विचारों से मैं काफ़ी कुछ सहमत हूँ। मुस्लिम तुष्टीकरण की नीति राष्ट्र के लिए विष साबित हो रही है और विभाजन की विभीषिका को झेलने के बाद भी छद्म-सेकुलरवादियों ने अपने इस पाखण्ड को चालू रखा है, यह बहुत ही कष्टप्रद बात है। हालाँकि कुछ बिन्दुओं पर मैं आपसे सहमत नहीं हूँ, मौक़ा लगा तो उसपर फिर कभी विस्तार से बात करेंगे।

हिन्दी में टिप्पणी करने के लिए माफ़ी चाहता हूँ, क्योंकि मेरी मराठी काफ़ी कमज़ोर है। मेरी माँ मराठी हैं, इसलिए एक तरह से मराठी मेरी मातृभाषा हुई। उम्मीद है आपकी आगामी प्रविष्टियाँ पढ़कर मेरी मराठी में कुछ सुधार होगा। आपकी अगली प्रविष्टि का इन्तज़ार रहेगा।

प्रतीक पाण्डे
www.HindiBlogs.com
 
Post a Comment<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?